वाढदिवसासाठी थँक्यू मेसेज कसा लिहावा?

वाढदिवसाला आपल्या जवळच्या आणि मित्रपरिवाराच्या भरघोस वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यावर त्यांना धन्यवाद देणं हे आलंच. कारण त्यांच्या शुभेच्छामुळे तुमचा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा होतो. त्यामुळे त्यांना धन्यवाद देणं आवश्यक आहे. मग ते धन्यवाद फक्त टेक्स्ट मेसेज, फेसबुक स्टेटस किंवा पर्सनलाइज्ड कार्डमार्फत असो. तुमच्या कृतज्ञतेचा प्रत्येक शब्द त्यांच्या प्रेमाला सार्थ ठरवत असतो. आता हे कसं करावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुमच्या मदतीसाठी खास हा लेख आणला आहे.

thanks for birthday wishes in marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छासाठी धन्यवाद देणं हे आजकाल फार ट्रेंडमध्ये आहे. कारण हे गरजेचं असून एक चांगली कृती म्हणून याकडे पाहिलं जातं. जसं तुम्हाला कोणी फेसबुकवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यास त्यांना धन्यवाद दिल्यास शुभेच्छांची पोचपावती आपोआप मिळते. जशी त्यांनी तुमची दखल घेतली तशी तुम्ही त्यांची दखल घेतली असा याचा अर्थ होतो.

वाढदिवसाचं थँक्यू कार्ड लिहिताना (While Writing Thank You Card)

birthday thank you cards marathi

जर तुम्ही वाढदिवसाची जंगी पार्टी देणार असाल तर त्या आधीच खास हाताने लिहीलेली नोट किंवा थँक्यू कार्ड्ससुद्धा नक्की बनवून ठेवा. जर तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीला तुमच्या वाढदिवसाच्या आयोजनासाठी धन्यवाद द्यायचं असल्यास कस्टमाईज्ड थँक्यू कार्डही बनवून घेऊ शकता किंवा एखादं रिटर्न गिफ्टही देऊ शकता. तुम्हाला खालील मुद्याच्या मदतीने थँक्यू नोट लिहीणं नक्कीच सोपं जाईल. 

– सुरूवातीलाच थँक्यू लिहा

– जर तुम्हाला त्या व्यक्तीने वाढदिवसाची भेट दिली असेल तर ते आवडल्याचंही नक्की लिहा

– तुमच्या वाढदिवसावर शुभेच्छामुळे झालेला सकारात्मक परिणामही नक्की सांगा. जसं माझा दिवस खूप छान गेला किंवा शुभेच्छामुळे भारावलो. 

– जर तुम्ही हे कार्ड हाताने लिहीणार असाल तर सर्वात शेवटी तुमची सही करा.

थँक्यू मेसेज किती लांब किंवा किती शब्दांचा असावा (How Long Should Be Your Message)

बरेच वेळा वाढदिवसाच्या शुभेच्छासाठी थँक्यू नोट छोटी आणि थेट असते. जर तुम्हाला लांबलचक थँक्यू नोट किंवा पत्र लिहायचं असेल तर काहीच हरकत नाही. जर तुम्ही सोशल मीडियावर थँक्यू नोट पाठवणार असाल तर ती छोटीच ठेवा. जर तुम्हाला एखाद्या चांगल्या मिळालेल्या गिफ्टसाठी आवर्जून थँक्यू म्हणायचं असेल तर मग थँक्यू नोट लांबलचक चालेल. आता तुम्हाला कळलं असेलच की, थँक्यू मेसेज किंवा थँक्यू नोट ही व्यक्तीनुसार बदलणारी असेल.

थँक्यू नोट केव्हा पाठवावी? (When To Send Thank You Note)

थँक्यू नोट पाठवण्यासाठी ठराविक वेळ असं नाही. पण साधारणतः सोशल मीडियावर शुभेच्छांची पोचपावती त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी दिली जाते. कारण ते साहजिक आहे. जर तुम्हाला आलेल्या शुभेच्छांसाठी तुम्ही आठवडाभरानंतर धन्यवाद दिलंत तर ते नक्कीच चांगल दिसणार नाही. आताच्या टेक्नोलॉजीमुळे तुम्हाला थँक्यू मेसेज किंवा थँक्यू नोट पाठवणंही सहज शक्य आहे. मग लगेचच पाठवून द्या.

थँक्यू मेसेज कि थँक्यू कार्ड (Thank You Message Or Thank You Card)

thank you message in marathi

जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने आठवणीने वाढदिवसासाठी गिफ्ट दिलं किंवा पाठवलं असेल तर थँक्यू कार्ड पाठवणं साहजिक आहे. जर फक्त शुभेच्छा दिल्या असतील तर थँक्यू मेसेज पुरेसा आहे. थँक्यू कार्ड पाठवायचं असल्यास तुम्ही ते स्वतः लिहून किंवा ऑनलाईन टेंपलेट्सचा वापर करून कस्टमाईजही करू शकता.

फेसबुकवर पाठवण्यासाठी थँक्यू मेसेज (Thank You Messages For Facebook)

आजकाल फेसबुकमुळे आपल्याला बरेच जणांच्या शुभेच्छा अगदी सहजपणे येतात. अगदी दूरवर राहणारे आठवणीने एकमेंकाना वाढदिवसाला शुभेच्छा देतात. त्यामुळे जवळ असोत वा लांब वाढदिवसाला आपल्याला सगळ्यांकडून शुभेच्छा मिळतातच. अगदी कधी कधी वर्षानुवर्षे न भेटलेले किंवा न बोललेले  लोकंही अशावेळी शुभेच्छा देतात. त्यामुळे प्रत्येकाला थँक्यू मेसेज पाठवणं मस्ट असतं. जर तुम्हाला फेसबुकवर थँक्यू म्हणण्यासाठी मेसेजेस हवे असल्यास खालील मेसेजचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. 

  • तुम्ही फेसबुकवर दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांमुळे मला खूप खूप कौतुका आणि आनंद वाटत आहे. तुम्हा सगळ्यांचे आभार. 
  • तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छामुळे माझा वाढदिवस परिपूर्ण झाला. थँक्यू फेसबुक फॅमिली.
  • माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी फेसबुकवर शुभेच्छा दिल्यामुळे छान वाटत आहे. थँक्यू 
  • तुमच्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. फेसबुकवरील नोटीफिकेशन्स पाहून माझा दिवस धन्य झाला. 
  • सकाळी उठल्यावर फेसबुक उघडताच तुमच्या शुभेच्छांनी वाढदिवस खऱ्या अर्थाने साजर झाला. थँक्यू एवढ्या प्रेमासाठी.

वाढदिवस शुभेच्छा धन्यवाद मेसेज कुटुंब आणि मित्रपरिवारासाठी (Birthday Thank U Msg for Friends and Family)

जर तुम्हाला आपल्या कुटुंबाला आणि मित्रपरिवाराला खास पद्धतीने थँक्यू मेसेज पाठवायचा असेल तर तुम्हाला खालील मेसेज नक्कीच उपयोगी पडतील. कारण तुमचा वाढदिवस हा तुमच्या इतकाच त्यांच्यासाठीही महत्त्वाचा असतो आणि खास करण्यासाठी तेही तितकीच मेहनत घेतात. मग तुमच्या थँक्यू मेसेजमुळे त्यांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य तर आलंच पाहिजे. 

  • थँक्यू सो मच माझ्या कुटुंबाला आणि मित्रपरिवाराला माझ्यावर वाढदिवसाच्या दिवशी केलेल्या प्रेमाबद्दल. मला तुम्हा सगळ्यांचे कौतुक करावेसे वाटते. 
  • माझ्या कुटुंब आणि मित्रांनी दिलेल्या शुभेच्छामुळे मला अगदी खास असल्यासारखं वाटलं. माझा वाढदिवस अविस्मरणीय केल्याबद्द्ल धन्यवाद. 
  • माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भरभरून आनंद दिल्याबद्दल खूप खूप आभार. तुम्ही सगळे माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. 
  • मी सदैव तुम्हा सगळ्यांचा या दिवसासाठी ऋणी राहीन. दरवर्षी तुम्ही माझा वाढदिवस तुमच्या शुभेच्छांनी खास बनवता. थँक्यू
  • काही झालं तरी माझ्या पाठीशी तुमच्या शुभेच्छा नेहमी असतील याची मला खात्री आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

थँक्यू मेसेजेस मुलांच्या वतीने देताना (Thank You Message On Behalf Of Children)

thank you for birthday wishes on behalf of my son in marathi

आजकाल मुलांचे वाढदिवस अगदी जल्लोषात साजरे केले जातात. वाढदिवसासोबत रिटर्न गिफ्ट आणि थँक्यू मेसेजही आवर्जून दिला जातो. मग अशावेळी काय लिहावं हा तुमचा प्रश्न दूर करण्यासाठी तुम्हाला खालील थँक्यू मेसेजेसचा नक्की उपयोग होईल. 

 

…….. वाढदिवसाला तुम्ही दिलेल्या शुभेच्छासाठी धन्यवाद. आमच्या मुलाला आनंद देण्यासाठी धन्यवाद. 

 

—— हा वाढदिवसाला मिळालेल्या गिफ्ट्स आणि शुभेच्छांमुळे फार खुष आहे. थँक्यू

 

तुम्ही सगळ्यांनी ——- चा वाढदिवस एकदम स्पेशल बनवलात. तुमच्या उपस्थिती आणि शुभेच्छांसाठी थँक्यू

 

थँक्यू —— दिलेल्या शुभेच्छांसाठी. असे आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यात वारंवार येवोत. 

 

खूप खूप धन्यवाद —– च्या बर्थडे पार्टीला येऊन त्याला शुभेच्छा दिल्याबद्दल. आम्ही खूप आनंदी आणि आभारी आहोत तुम्हा सगळ्यांचे.

जाता जाता… Keep In Mind

तुम्ही वाढदिवसाला मिळालेल्या शुभेच्छांसाठी थँक्यू नोट लिहा अथवा थँक्यू मेसेज करत असताना त्यात कृतज्ञतेची भावना नक्की नमूद करा. तसंच वाढदिवस शुभेच्छांसाठी धन्यवादही वेळेवर आणि थोडक्यात नक्की द्या. कारण यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंब, मित्रपरिवार आणि ज्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या त्यांच्याबाबत तुम्हाला कौतुक असल्याचं दिसून येतं.

Similar Posts