Friendship Quotes In Marathi Shayari
अनुभव सांगतो की, एक विश्वासू मित्र,
हजार नातेवाईकां पेक्षा चांगला असतो.
लोक प्रेमात वेडे आहेत आणि आम्ही मैत्रीत.
जास्त काही नाही फक्त “एक”असा मित्र हवा जो,
खिशाचे वजन पाहून बदलणार नाही.
त्यांच्याप्रती निष्ठावंत आणि कर्जदार राहा जे तुम्हाला वेळ देतात,
कारण परिणाम कर्णालाही माहित होता,
पण मुद्दा मैत्री टिकवून ठेवण्याचा होता !
खूप वेळेनंतर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेलो, च
हावाल्याने विचारलं चहा सोबत काय घ्याल ?
मी विचारले जुने मित्र भेटतील !
किती कमाल असते ना ही मैत्री,
वजन तर असतं… मात्र ओझं असतं नसतं.
तेही काय बालपण होतं…!
दोन बोटं जोडल्याने मैत्री व्हायची.
कधीकधी माझ्या नालायक मित्रांकडे पाहून विचार येतो,
काय होईल तिचं, जी यांच्या सोबत लग्न करेल ?
एका मित्रासोबत अंधारात चालणे,
एकटे प्रकाशात चालण्यापेक्षा कधीही चांगले.
अगोदर 20 रुपयाच्या “टेनिस बॉल” साठी 11 मित्र पैसे गोळा करायचे,
आता “टेनिस बॉल” तर एकटा घेऊन येतो, मात्र 11 मित्र एकत्र होत नाही.
जीवनात बरेच मित्र आले, काही हृदयात स्थिरावले,
काही डोळ्यात स्थिरावले, काही हळूहळू दूर गेले,
पण जे हृदयातून नाही गेले ते तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले.
मित्रांची मैत्री खिचडी पेक्षा कमी नसते,
स्वाद जरी नसला तरी भूक मात्र नक्की मिटवून देते.
आम्हीपण कोयल्या प्रमाणे किरकोळच होतो,
ते तर तुमच्या सारखे मित्र मिळाले ज्यांनी आम्हाला हिरा बनवून टाकले.
प्रश्न पाण्याचा नाही तहानचा आहे,
प्रश्न मरणाचा नाही श्वासाचा आहे,
मित्र तर जगात भरपूर आहेत,
पण प्रश्न मैत्रीचा नाही विश्वासाचा आहे.
मला कधी मैत्रीची किंमत नको विचारू,
वृक्षांना कधी सावली विकतांना पाहिलंय…!
माझ्या मित्रांची ओळख इतकी अवघड नाही,
मला रडताना बघून ते त्यांचे हसन विसरून जातात.
सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात,
फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो.
यश हे जिद्दीने मिळते, आणि जिद्द मित्र वाढवतात,
आणि मित्र भाग्याने मिळतात,
आणि भाग्य माणूस स्वतः बनवतो.
मित्र कितीही वाईट झाला तरी,
त्याच्यासोबत मैत्री नका तोडू,
कारण पाणी कितीही खराब झाले तरी,
ते आग विजवण्याचा कामात येतच असते.
मैत्री एक थंड हवेची लहर आहे,
मैत्री हे विश्वासाचे दुसरं नाव आहे,
बाकीच्यांसाठी काहीही असो,
मात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे.
मित्र तोच असतो जो तुमच्या भूतकाळाला स्वीकारतो,
तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही जसे आहात तसाच तुम्हाला स्वीकारतो.
जीवनात अनेक मित्र बनवणे ही एक साधारण गोष्ट आहे,
पण एकच मित्राबरोबर आयुष्यभर मैत्री टिकवून ठेवणे ही एक असामान्य गोष्ट आहे.
फोटो काढण्याची काही आवड नाही आहे मला,
पण काय करू माझ्या मित्राला माझा फोटो बघितल्याशिवाय झोपच येत नाही.
जीवन एक Railway Station प्रमाणे आहे,
प्रेम एक Train प्रमाणे आहे येते आणि निघून जाते,
पण मैत्री हे Enquiry Counter आहे,
जी नेहमी म्हणत असते May I Help You.
आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवं,
काहीवेळा मैत्री ही प्रेमा पेक्षा मोठी असते.
तुझी आणि माझी मैत्रीण इतके घट्ट असायला हवी की,
नोकरी तू करायचे आणि पगार मी घे घेईन.
आम्ही वेळ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही,
मित्रासाठी वेळ घालवत असतो.
वेळेवर मैत्री तर प्रत्येक जण करतो खरी मैत्री ती असते ,
जी एक वेळेनुसार नाही बदलत.
एक गोष्ट लक्षात ठेवा, शोधल्यावर तेच मिळतील जे हरवले आहे,
ते नाही जे बदललेले आहे.
मैत्री ती नाही जी जीव देते,
मैत्री तीही नाही जे हास्य देते,
खरी मैत्री तर ती असते जी,
पाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते.
सात चालण्यासाठी साथी हवा,
अश्रू रोखण्यासाठी हसू हवं,
जिवंत राहायला जीवन हवं आणि जीवन जगण्यासाठी तुमच्या सारखा मित्र हवा.
ज्या चहात साखर नाही,
ती चहा पिण्यात मजा नाही आणि ज्या जीवनात मैत्री नाही,
असे जीवन जगण्यात मजा नाही.