Chanakya Niti Marathi Status
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Chanakya Niti Marathi Status शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला चाणक्य नीति आणि Chanakya Status पाहायला मिळतील. येथे तुम्हाला सर्व वीर पुरुषांचे जसे की,
- छत्रपती शिवाजी महाराज
- महात्मा ज्योतिबा फुले
- शहीद भगतसिंग
- लोकमान्य टिळक
- स्वामी विवेकानंद
- बाबासाहेब आंबेडकर
- एपीजे अब्दुल कलाम
आणि इतर महापुरुषांचे विचार देखील पाहायला मिळतील. त्याव्यतिरिक्त तुम्हाला इथे नवनवीन Marathi Jokes, Love Shayari Marathi For Girlfriend, Sad Marathi Status व इतर Marathi Status देखील पाहायला मिळतील.
जीवनाच्या शर्यतीत जे लोक तुम्हाला “धावुन” नाही हरवू शकत, ते तुम्हाला “पाडून” हरवण्याच्या प्रयत्न करतात.
सर्वात मोठा गुरुमंत्र आहे की, कधीच स्वतःचे रहस्य दुसऱ्यांना नका सांगू, हे तुमच्या विध्वंसाचे कारण बनू शकते.
मान तेवढेच खाली घाला जेवढी गरज आहे, विनाकारण जास्त मान जास्त खाली घातल्याने दुसऱ्यांच्या अहंकाराला प्रोत्साहन देते.
जर का प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला अपयश आले, तरी तुम्ही त्या व्यक्ती पेक्षा चांगल्या स्थितीत रहाल ज्याला प्रयत्न न करता यश आले.
ज्याप्रकारे एक वासरू गायांच्या कडपा मध्ये आपल्या आईच्या मागे-मागे चालते, त्याच प्रकारे मनुष्याचे चांगले आणि वाईट कर्म त्याच्या मागे मागे चालतात.
कधीच कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण नका देऊ. कारण ज्याला तुमच्यावर विश्वास आहे त्याला स्पष्टीकरणाची गरज नाही, आणि ज्याला तुमच्यावर विश्वास नाही तो तुमचे स्पष्टीकरण स्वीकारणार नाही.
वाईट व्यक्ती आणि काटे यापासून वाचण्याचे फक्त दोनच उपाय आहे, एक तर त्यांना पायाखाली चिरडून टाका किंवा दुसरा आहे की त्यांच्यापासून वाटेल तेवढे अंतर ठेवा.
तुमच्या जीभेची शक्ती कधीच तुमच्या आई-वडिलांवर वापरू नका, ज्यांनी तुम्हाला बोलायला शिकवले.
दुसऱ्यांमध्ये दोष शोधण्यात वेळ वाया घालू नका, स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी समाप्त होऊन जाते.
वाईट व्यक्तीच्या गोड शब्दांवर कधीच विश्वास नका करू. ज्याप्रकारे सिंह हिंसा करणे नाही सोडू शकत, त्याच प्रकारे वाईट व्यक्ती हि त्यांचा मूळ स्वभाव नाही सोडू शकत.
तुमचे आनंदी राहणे तुमच्या शत्रू साठी सर्वात मोठी शिक्षा आहे.
जो तुमचे बोलणे ऐकत असताना इकडे तिकडे बघत असेल, त्या व्यक्तीवर कधीच विश्वास नका करू.
मूर्ख व्यक्ती सोबत वाद करणे टाळावे, कारण यात आपण स्वतःच्याच वेळ वाया घालत असतो.
यशस्वी होण्याकरिता चांगल्या मित्रांची गरज असते, आणि जास्त यशस्वी होण्याकरिता चांगल्या शत्रूंची गरज असते.
कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापुर्वी स्वतःला हे तीन प्रश्न नक्की विचारा:
- मी हे का करतो आहे?
- याचे काय परिणाम होतील?
- का हे कार्य यशस्वी होईल?
जेव्हा तुम्ही या प्रश्नांचा विचार कराल, तेव्हाच तुम्ही ते कार्य मनपूर्वक पार पाडू शकाल.
कमाई पुरेसे नसेल तर खर्चावर नियंत्रण ठेवा आणि माहिती पुरेसे नसेल तर शब्दांवर नियंत्रण ठेवा.
फुलांचा सुगंध हवेच्या दिशेनेच पसरतो, मात्र एका व्यक्तीच्या चांगुलपणा चोहीकडे दरवळतो.